चीनी अ‍ॅप्सवर बंदी हा ‘डिजिटल स्ट्राईकच’ – रविशंकर प्रसाद

भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. आता सरकारच्या या निर्णयाला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी डिजिटल स्ट्राईक म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील एका रॅलीमध्ये प्रसाद म्हणाले की, भारताने चीनवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. आम्ही देशातील लोकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. हे एक डिजिटल स्ट्राईक होते.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, भारत शांतीच्या बाजूने आहे. मात्र जर कोणी वाईट नजर ठेवत असल्यास, त्याला उचित उत्तर दिले जाईल.

सरकारने लडाख सीमावादाच्या पार्श्वभूमीवर देशात 59 चीनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये टीक-टॉक, यूसी ब्राउजर, शेअरइट, हेलो आणि लाईकी सारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे. डेटा आणि प्रायव्हेसीच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.

Leave a Comment