चीनी अ‍ॅप डिलीट करा आणि मोफत मिळवा मास्क, भाजप आमदाराचे खास अभियान

भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. सरकारने चीनच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी देखील घातली. आता उत्तर प्रदेशमधील बहराइचच्या भाजप आमदार आणि माजी मंत्री अनुपमा जायसवाल यांनी लोकांच्या मोबाईलमध्ये चीनी अ‍ॅप डिलीट करण्यासाठी खास अभियान सुरू केले आहे. यासाठी ते प्रत्येक अ‍ॅप डिलीट केल्यावर एक मास्क मोफत देत आहेत.

अनुपमा जायसवाल यांनी सांगितले की, केंद्र सरकारने 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर त्यांनी बहराइचच्या सर्वसामान्य लोकांच्या फोनमधून चीनी अ‍ॅप डिलीट करण्याचे अभियान सुरू केले आहे. सर्वसामान्य लोकांना प्रेरित करण्यासाठी प्रत्येक अ‍ॅप डिलीट केल्यावर त्यांना एक मास्क देखील मोफत दिला जात आहे.

महिला कार्यकर्त्यांसह जायसवाल यांनी हे अभियान सुरू केले आहे. 4-5 महिला कार्यकर्ता शहरातील मुख्य बाजारात फिरून लोकांना मोबाईलमधील चीनी अ‍ॅप डिलीट करण्यास सांगत आहेत. या महिलांसोबत स्मार्ट फोनची माहिती असणारे तरूण-तरूणी देखील असतात. जेणेकरून वेळ वाया न घालवता त्वरित नागरिकांच्या फोनमधून अ‍ॅप डिलीट करता येतील.

Leave a Comment