एक्स-रे द्वारे समजणार कोरोना आहे की नाही ?, आयआयटी गांधीनगरच्या संशोधकांचा दावा

कोरोना चाचण्यांमध्ये वाढ व्हावी यासाठी सरकारने चाचणी शुल्क देखील कमी केले आहे. असे असले तरी देखील कोरोना टेस्टिंगबाबत लोक संतुष्ट नाहीत. यातच आता आयआयटी गांधीनगरच्या एम-टेकचा विद्यार्थी आणि त्याच्या प्राध्यपकांनी छातीच्या एक्स-रे द्वारे कोरोनाची लागण झाली आहे की नाही, ते समजू शकते असा दावा केला आहे.

रिसर्चमध्ये सहभागी असलेले आयआयटी गांधीनगरचे प्राध्यापक कृष्णा मियापुरम म्हणाले की, कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. हे एक ऑनलाईन उपकरण असून, याद्वारे एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आहे की नाही याची एक्स-रे द्वारे माहिती मिळेल. संशोधकांनुसार, याचा वापर अर्ली टेस्टिंगसाठी केला जाऊ शकतो.

एमटेकचा विद्यार्थी असलेल्या कुशपाल सिंह यादवने हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. कुशपाल म्हणाला की, विश्वसनीय उपकरण तयार करण्यासाठी योग्य अल्गोरिद्म आणि आकड्यांची गरज असते. आमचे उपकरण उपयोगी सिद्ध होईल. या उपकरणाचा वापर व्यापक स्तरावर करता येईल.

Leave a Comment