सुशांतच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये मृत्यूबाबत ‘हा’ खुलासा


मंगळवारी संध्याकाळी सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा रिपोर्ट समोर आला असून या रिपोर्टमध्ये सुशांत सिंहच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे संशयित रसायन किंवा विषारी पदार्थ आढळून आले नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. पोस्टमॉर्टमनंतर व्हिसेरा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात विश्लेषणासाठी पाठवण्यात आले.

रिपोर्टमध्ये दिलेल्याम माहितीनुसार मृत्यूच्या आधी कोणत्याही संघर्षाचे किंवा झटापटीचे संकेत मिळालेले नाहीत. तसेच सुशांतच्या नखांमध्येही काहीच आढळून आलेले नाही. गेल्या आठवड्यात सुशांत सिंहचा अंतिम शवविच्छेदन अहवाल आला होता. त्यामध्ये सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे श्वास गुदमरून झाल्याचे सांगण्यात आले होते. पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाच डॉक्टरांच्या टीमने तयार केला होता. याआधी आलेल्या प्रोव्हिजन पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे श्वास गुदमरून झाल्याचे सांगण्यात आले होते.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या प्रकरणी त्याची सहकलाकार संजना सांघीने आपला जबाब नोंदवला आहे. अभिनेता सुशांत सिंह सोबत ‘दिल बेचारा’ या चित्रपटात संजना सांघीने काम केले आहे. दुर्दैवाने हा सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरला. संजनाने आपला जबाब मंगळवारी सकाळी वांद्रे पोलीस स्थानकात नोंदवला. या केसमध्ये पोलिसांनी सुशांतचे कुटुंबीय आणि त्याच्या मित्र परिवारासहित 28 लोकांचे जबाब नोंदवले आहेत.

Leave a Comment