गोल्डन बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुधीर कुमार मक्कड यांचे निधन


नवी दिल्ली – पूर्व दिल्लीत राहणारे आणि हरिद्वारमधील अनेक आखाडयांशी संबंधित असणारे दररोज अंगावर किलोभर सोने घालून वावरणाऱ्या गोल्डन बाबा उर्फ सुधीर कुमार मक्कड यांचे एम्स रुग्णालयात बुधवारी निधन झाले.

सुधीरकुमार मक्कड असे गोल्डन बाबाचे खरे नाव आहे. ते मूळचे गाझियाबादचे होते. सुधीरकुमार मक्कड संन्यासी बनण्यापूर्वी दिल्लीत गारमेंट्सचा व्यापार करत होते. ते आपल्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी काही काळापूर्वी बाबा बनले होते. गोल्डन बाबांचा गांधीनगरच्या अशोक गल्लीत एक आश्रम आहे. सगळीकडे सोने घालून वावरण्याचा गोल्डन बाबांना शौक होता. ते सोन्यालाच आपला इष्ट देवता मानत असे. बाबाच्या सुरक्षेसाठी नेहेमी त्याच्या अवतीभोवती २५- ३० सुरक्षा रक्षक तैनात असायचे. कारण त्यांच्यावर असंख्य गुन्हेदेखील दाखल झाले होते.

Leave a Comment