शेखर सुमन यांची धक्कादायक माहिती; महिन्याभरात सुशांतने बदलली ५० सिमकार्ड्स


अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असतानाच त्याचा आत्महत्येसंदर्भात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यातच मंगळवारी पत्रकार परिषदेत शेखर सुमन यांनी सुशांतविषयी काही धक्कादायक माहिती सांगितली. यावेळी बोलताना शेखर सुमनम म्हणाले की, हे प्रकरण जेवढे डोळ्यांना दिसत आहे तेवढे साधे हे प्रकरण नसल्याचे म्हणत या प्रकरणाची सीबीआय चौकशी झालीची पाहिजे अशी मागणी शेखर सुमन यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

सुसाइड नोट सुशांतच्या घरात मिळाली नाही, घराची बनावट चावीसुद्धा सापडत नाही आणि त्याने महिन्याभरात ५० वेळा सिमकार्ड्स बदलले होते. त्यामुळे सुशांतची आत्महत्या हे काही वाटते तेवढे सोपे प्रकरण नसल्याचे मला वाटते, असे त्यांनी म्हटले आहे. सुशांतने जरी आत्महत्या केली तरी त्याच्या आत्महत्येमागे दोषी असलेल्यांना शोधून काढावे आणि सुशांतला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद सुशांतच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेखर सुमन या वादावर बोलताना पुढे म्हणाले, शाहरुख खान आणि माझ्याशिवाय सुशांतच असा व्यक्ती होता, ज्याने टीव्हीपासून सुरुवात केली आणि मोठ्या पडद्यावर यश मिळवले. सुशांतने बड्या कलाकारांच्या अहंकाराकडे कधीच लक्ष दिले नाही, पण त्याची हीच गोष्ट अनेकांच्या डोळ्यांत खुपली असेल. त्याचबरोबर पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करणे चुकीचे असल्याचे म्हणत शेखर सुमन यांनी कोणाचीही नावे न घेता सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

Leave a Comment