सॅमसंगने लाँच केले शानदार स्मार्ट टिव्ही, किंमत 15 लाखांपर्यंत

सॅमसंग कंपनीने लाईफस्टाइल टेलिव्हिजन रेंजला भारतात लाँच केले आहे. कंपनीने द सेरिफ लाईफस्टाइल टिव्ही सीरिज (The Serif lifestyle TV) आणि 2020 QLED 8के टिव्ही फ्लॅगशिप सीरिज लाँच केली आहे. सॅमसंगची द सेरिफ टीव्ही सीरिज खास होम डेकोरेशनप्रमाणे ठेवण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. हे स्मार्ट टिव्ही सर्वसाधारण टिव्हींपेक्षा वेगळे आहेत.

Image Credited – samsung

कंपनीने द सेरिफ सीरिज 43 इंच, 49 इंच आणि 55 इंच मॉडेल्समध्ये लाँच केली आहे. तर QLED 8के टिव्हीमध्ये सुपर थिन फॉर्म फॅक्टर व्यतिरिक्त 8के पिक्चर क्वॉलिटी आणि सराउंड साउंड ऑडिओ आउटपूट देखील मिळेल. QLED 8के टिव्ही सीरिजमध्ये इनफिनिटी स्क्रीन, क्यू-सिम्फॉनी, ऑब्जेक्ट ट्रॅकिंग साउंड+  अ‍ॅक्टिव्ह वॉइस एम्प्लिफायर सारखे शानदार साउंड एक्सपिरियंस फीचर्स मिळतात.

Image Credited – samsung

द सेरिफ लाईफस्टाईल सीरिजच्या किंमतीबद्दल सांगायचे तर 43 इंच व्हेरिएंटची किंमत 83,900 रुपये आहे. तर 49 इंच टिव्हीची किंमत 1,16,900 रुपये आणि 55 इंच व्हेरिएंटची किंमत 1,48,900 रुपये आहे. 8 ते 17 जुलै दरम्यान टिव्ही खरेदी केल्यास काही सूट देखील मिळेल.

Image Credited – samsung

सॅमसंगच्या फ्लॅगशिप QLED 8के टिव्हीबद्दल सांगायचे तर  65 इंच व्हेरिएंटची किंमत 4.99 लाख रुपये, 77 इंच व्हेरिएंट – 9.99 लाख रुपये, 82 इंच व्हेरिएंट – 14.29 लाख रुपये आणि 85 इंच व्हेरिएंटची किंमत 15.75 लाख रुपये आहे. काही ठराविक स्टोर्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हे टिव्ही खरेदी करता येतील. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि फेडरल बँकेच्या कार्ड्सने पेमेंट केल्यावर 15 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील मिळेल.

Leave a Comment