लालबागचा राजाच्या “आरोग्यत्सव”चे पूजा भट्टने केले कौतुक


मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लहान आकाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या सर्वांना लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अपवाद ठरले आहे. कारण यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव साजरा न करता ‘आरोग्यत्सव’ साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. अभिनेत्री पूजा भट्ट हिने त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. हा अत्यंत प्रेरणादायी निर्णय असल्याचे तिने म्हटले आहे.


याबाबत आपली प्रतिक्रिया देण्यासाठी पुजा भट्टने एक ट्विट केले आहे. पुजा आपल्या ट्विटमध्ये खरच हा एक कौतुकास्पद निर्णय आहे. मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांना प्रेरणा मिळेल. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापासून आपण सर्वांनी प्रेरणा घेत अशी मदत करायला हवी. जय जय महाराष्ट्र माझा, असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे हे ट्विट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Leave a Comment