चीनची चाल; एलएसीवर तैनात केले 20 हजार सैनिक

एकीकडे भारत चीनवर आर्थिक मोर्च्यावर मात करण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे चीन सीमेवरील सैन्याची तैनाती वाढवत असल्याची दिसत आहे. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने लडाख येथील एलएसीवर 20 हजारांपेक्षा अधिक सैन्य तैनात केले आहेत. शिनजियांग भागात तैनात 10-12 हजार चीनी सैन्यांच्या हालचालींवर भारत लक्ष ठेवून आहे.

चीनी सैन्याने पुर्व लडाख सेक्टरमध्ये जवळपास दोन डिव्हिजन (जवळपास 20000 जवान) तैनात केले आहे. याशिवाय चीनने आणखी एका 10 हजार जवानांच्या तुकडीला उत्तर शिनजियांग प्रांतात तैनात केले आहे. सपाट भूभागामुळे या सैन्याला घटनास्थळी पोहण्यासाठी 48 तास लागतील.

अमर उजालाच्या वृत्तानुसार, सुत्रांनी सांगितले की आम्ही त्या सैनिकांच्या हालचालींवर लक्ष्य ठेवून आहोत. भलेही भारत आणि चीन सहा आठवड्यांहून अधिक काळ मुत्सद्दी व सैन्य पातळीवर चर्चा करत असले, तरी देखील या ठिकाणी चीनकडून सैन्य किंवा उपकरणांची संख्या कमी करण्यात आलेली नाही. तिबेट भागात सर्वसाधारणपणे चीनच्या दोन तुकड्या असतात. मात्र आता भारतीय चौक्यांपासून जवळपास 2 हजार किमी अंतरावर अजून दोन तुकड्या तैनात केल्या आहेत. चीनच्या हालचाली लक्षात घेऊन भारतीय सैन्याने देखील या भागातील जवानांची संख्या वाढवल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment