चिनी अ‍ॅप टीक-टॉकची वकिली करण्यास मुकूल रोहतगी यांचा नकार


नवी दिल्ली – पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात घडलेल्या घटनेनंतर देशभरात चीनविरोधात संतापाचे वातावरण आहे. त्यातच भारत सरकारने सोमवारी संध्याकाळी देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत असल्याच्या आधारे टीक-टॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली.


देशातील नागरिकांकडून चिनी सामानांवर बहिष्कार घालण्याची मागणी होत असताना आता टीक-टॉक अ‍ॅपची न्यायालयात बाजू मांडण्यास माजी अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी नकार दिला आहे. रोहतगी यांनी चिनी अ‍ॅपची वकिली करणार नसल्याचे म्हटले आहे.

मी भारत सरकारने बंदी घातलेल्या चिनी अ‍ॅपच्या बाजूने खटला लढणार नसल्याचे म्हणत मुकुल रोहतगी यांनी टीक-टॉकची बाजू न्यायालयात मांडण्यास नकार दिला. भारत सरकारविरोधात मी चिनी अ‍ॅपसाठी लढणार नसल्याचे रोहतगी म्हणाले. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

Leave a Comment