व्हायरल; खालून असा दिसतो गुरू ग्रह, नेटकरी म्हणाले, ‘हा तर डोसा’

सोशल मीडियावर एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. एका ट्विटर युजरने हा फोटो शेअर करत हा गुरु ग्रह असल्याचे म्हटले आहे. मात्र फोटो पाहून हा गुरु ग्रह नाही तर चक्क डोसा वाटतो.

ट्विटर युजर @Iearnsomethlng ने हा फोटो शेअर करत लिहिले की, गुरु ग्रह खालून काहीसा असा दिसतो. ट्विटरवर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी हा गुरु ग्रह आहे की माहित नाही, मात्र हा दक्षिण भारतातील व्यंजन डोसा नक्की आहे, असे म्हटले.

या फोटोला आतापर्यंत 30 हजारांपेक्षा अधिक युजर्सनी लाईक केले असून, शेकडो युजर्सनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. अनेक युजर्सनी गुरू ग्रह हा अगदी डोशाप्रमाणेच दिसतो, असे म्हटले.

Loading RSS Feed

Leave a Comment