आयफोन ‘एक्सएस मॅक्स’ झाला तब्बल 40 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

एकीकडे काही स्मार्टफोन कंपन्या आपल्या मोबाईलच्या किंमती वाढत आहे. तर दुसरीकडे अ‍ॅपलने आपल्या आयफोन एक्सएस मॅक्सची किंमत मोठ्या प्रमाणात कमी केली आहे. अ‍ॅमेझॉनवर आयफोन एक्सएस मॅक्सवर तब्बल 40 हजार रुपये फ्लॅट डिस्काउंटसह मिळत आहे. 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची मुळ किंमत 1,09,000 रुपये आहे. मात्र अ‍ॅमेझॉनवर 36 टक्के सूटमुळे हा फोन कमी किंमतीत केवळ 69,900 रुपयांना मिळत आहे.

Image Credited – Business Insider

आयफोन एक्सएस मॅक्सवरील ही ऑफर कधीपर्यंत राहील याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हा फोन गोल्ड, सिल्वर आणि स्पेस ग्रे या तीन रंगात उपलब्ध आहे. 36 टक्के सूटसह गोल्ड रंगातील व्हेरिएंट दिले जात आहे. सिल्वर रंगातील व्हेरिएंट सध्या आउट ऑफ स्टॉक आहे. तर फोनचे स्पेस ग्रे रंगातील व्हेरिएंट सध्या 68,900 रुपयांच्या प्राइस टॅगसह लिस्ट आहे.

Image Credited – theapplepost

आयफोन एक्सएस मॅक्सच्या फीचरबद्दल सांगायचे तर यात 6.5 इंच सुपर रेटिना ओलेड डिस्प्ले देण्यात आलेला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 12 मेगापिक्सल ड्यूल कॅमेरा देण्यात आलेला आहे. सेल्फीसाठी यात 7 मेगापिक्सल ट्रूडेप्थ कॅमेरा मिळेल. फोनला आयपी68 रेटिंग मिळाले असून, हा फोन 2 मीटर पाण्याच्या आत 30 मिनिटे राहू शकतो.

Leave a Comment