आता हायवे प्रकल्पांमध्ये देखील चीनी कंपन्यांना बंदी – नितीन गडकरी

चीनसोबतच्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारताने आर्थिक आघाडीवर चीनची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता चीनच्या कंपन्यांना हायवे प्रकल्पांचे देखील कंत्राट दिले जाणार नसल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

नितीन गडकरी म्हणाले की, भारत आता हायवे प्रकल्पांमधील चीनी कंपन्यांचा प्रवेश बंद करणार आहे. एखाद्या चीनी कंपनीने जॉइंट वेंचरच्या माध्यमातून जरी हायवे प्रकल्पांमध्ये प्रवेश केल्यास, त्यावर बंदी घातली जाईल. एमएसएमई सेक्टरमध्ये देखील चीनी गुंतवणूकदारांनी प्रवेश करू नये, याची देखील सरकार काळजी घेईल.

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारतीय रेल्वेने देखील चीनी कंपनीला दिलेले 471 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले होते. रेल्वेने चीनी कंपनी बीजिंग नॅशनल रेल्वे रिसर्च अँड डिझाईन इंस्टिट्यूट ऑफ सिग्नल अँड कम्यूनिकेशनला दिलेले कॉन्ट्रॅक्ट रद्द केले होते.

Leave a Comment