मेथी समजून कुटुंबाने खाल्ली गांजाची भाजी, पुढे काय झाले वाचा - Majha Paper

मेथी समजून कुटुंबाने खाल्ली गांजाची भाजी, पुढे काय झाले वाचा

उत्तर प्रदेशच्या कन्नौज येथील एका कुटुंबातील सहा सदस्यांवर गंमतीगंमतीमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वेळ आली आहे. येथील एका कुटुंबाने मेथी समजून चक्क गांजाची भाजी बनवून खाल्ल्याने संपुर्ण कुटुंब आजारी पडले व त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गावातील एका व्यक्तीने सहज गंमतीगंमतीमध्ये मेथीच्या ऐवजी भाजी बनविण्यासाठी कुटुंबाला गांजा दिला होता. पोलिसांनी कारवाई करत आता व्यक्तीला अटक केले आहे.

कन्नौज येथील मियागंज गावातील नवल किशोर नावाच्या व्यक्तीने ओमप्रकाश यांचा मुलगा नितेशला सुकलेली मेथी सांगून गांजा दिला. घरी गेल्यावर कुटुंबाने मेथी समजून त्याची भाजी केली व सर्व कुटुंबाने सांयकाळी 5 वाजता जेवण देखील केले. मात्र काही वेळातच सर्वांची प्रकृती बिघडली. यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना डॉक्टरांना बोलवण्यास सांगितले. मात्र काही वेळातच सर्वजण बेशुद्ध पडले.

शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर या कुटुंबाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी गांजा जप्त केला असून, आरोपीला अटक केले आहे.

Leave a Comment