कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईत १५ जुलैपर्यंत संचारबंदी


मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या आर्थिक राजधानी मुंबईतील बाधितांच्या वाढत्या आकडेवारीच्या या पार्श्वभूमीवर मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, सकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्तालयाने पत्रकाद्वारे दिली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने यापूर्वी मिशन बिगीन अंतर्गत बऱ्याच प्रमाणात सवलत दिली होती. पण मागील काही दिवसांपासून राज्यात, तसेच प्रामुख्याने मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज मध्यरात्रीपासून १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment