अमानवीय! कर्नाटकमध्ये कोरोनाग्रस्तांचे शव फेकले जात आहेत खड्ड्यात

कर्नाटकच्या बेल्लारी येथील अमानवीय अशी घटना समोर आली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांना प्लास्टिक बॅगमध्ये टाकून खड्ड्यात फेकून दिले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. समोर आलेल्या व्हिडीओनुसार जवळपास 8 शव खड्ड्यात फेकण्यात आल्याचे दिसत आहे. या लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात एनडीटिव्हीने वृत्त दिले आहे.

बेल्लारीचे उपायुक्त एस.एस. नकुल म्हणाले की, मृतदेहांच्या अंतिम क्रियेत प्रोटोकॉलचे पालन केले गेले आहे, परंतु ‘मानवतावादी’ पैलूकडे दुर्लक्ष केले गेले आहे. बेल्लारी प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

नकुल म्हणाले की, आम्ही या प्रकरणाची तपासणी करत आहोत. जर तुम्ही व्हिडीओ पाहिला असेल, तर दिसेल की शव व्यवस्थित पॅक करण्यात आलेले आहेत. या प्रकरणात मानवी दृष्टीने पाहिला हवे. या कारणामुळे चौकशी केला जात आहे. शवांची योग्यरित्या विल्हेवाट लावण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. मानवीय आधारावर हे अयोग्य आहे. प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळे अंत्यसंस्कार होणे गरजेचे होते. आम्ही चौकशी करू व योग्य ती कारवाई करू.

एएनआयनुसार, शवांची अयोग्यरित्या विल्हेवाट लावणाऱ्या टीमला हटविण्यात आले असून, त्यांच्या जागी प्रशिक्षित टीमला नेमण्यात आले आहे. सोबतच मृतांच्या नातेवाईकांची माफी मागण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी देखील या घटनेला ‘अमानवीय आणि दुखःद’ म्हटले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment