चीनमध्ये सर्वात मोठा घोटाळा, तब्बल 83 टन सोने निघाले बनावटी

जगभरात बनावट आणि नक्कल केलेल्या वस्तू विकण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चीनमधील एक मोठा घोटाळा समोर आला आहे. चीनच्या सोन्याच्या साठ्या पैकी 4 टक्के म्हणजे जवळपास 83 टन सोने बनावटी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनच्या वुहान शहरातील एका मोठ्या ज्वेलरी कंपनीने हा घोटाळा केला आहे. किंगोल्ड नावाच्या ज्वेलरी कंपनीने चीनच्या 14 फायनेंशियल कंपन्यांकडून मागील 5 वर्षात 2.8 बिलियन डॉलर्सचे (जवळपास 21,148 कोटी रुपये) कर्ज घेतले आहे. हे कर्ज घेण्यासाठी या कंपनीने बनावट बिस्किटे तारण म्हणून ठेवली होती.

Image Credited – aajtak

हा चीनच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे सांगितले जात आहे. किंगोल्ड कंपनी नॅसडॅक स्टॉक एक्सजेंचमध्ये लिस्टेड आहे. सोन्याचे काम करणारी ही जगातील सर्वात मोठी खाजगी कंपनी आहे. कंपनीचे बाजार मूल्य 8 मिलियन डॉलर्स आहे. किंग्लोड ज्वेलरी कंपनीने 16 बिलियन युआन (जवळपास 17 हजार कोटी रुपये) कर्जासाठी तारण म्हणून 83 टन सोन्याची बिस्किटे सुरक्षा व विमा म्हणून ठेवली होती. मात्र तपासणीमध्ये ही बिस्किटे तांब्याची असल्याचे समोर आले. आता हे कर्ज कंपनीच्या 30 बिलियन युआन संपत्तीमधून वसूल केले जाणार आहे.

Image Credited – aajtak

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कंपनीने डोंगगुआन ट्रस्ट को. लिमिटेडचे कर्ज फेडले नाही. यानंतर डोंगगुआनने किंगोल्डने जमानत म्हणून ठेवलेल्या सोन्याच्या बिस्किटांची तपासणी केल्यावर ही बिस्किटे ताब्यांची असल्याचे समजले.  यानंतर किंगोल्डला सर्वाधिक कर्ज देणाऱ्या चायना मिनशेंग ट्रस्ट कंपनीने देखील न्यायालयाकडून परवानगी घेत किंगोल्डचे तारण ठेवलेले सोने तपासले व ते सोने देखील बनावट आहे.

Image Credited – aajtak

मात्र किंगोल्डचे मालक जिया झिहोंग यांनी हे आरोप फेटाळले आहेत. जिया म्हणाले की, आम्ही कधीच बनावट सोन्याची बिस्किटे ठेवली नाहीत व त्याचा तारण म्हणून उपयोग केलेला नाही. किंगोल्ड कंपनीची 2002 साली स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी ही एक सोन्याची फॅक्टरी होती.

Leave a Comment