... म्हणून कर्नाटकमध्ये चक्क 50 बकऱ्यांना करण्यात आले क्वारंटाईन - Majha Paper

… म्हणून कर्नाटकमध्ये चक्क 50 बकऱ्यांना करण्यात आले क्वारंटाईन

कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरातून आता ग्रामीण भागात देखील हा व्हायरस पसरला असून, प्राण्यांना देखील याची लागण होत असल्याचे समोर आले आहे. कर्नाटकच्या गोडकेरे गावात मेंढपाळाला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्याच्या जवळपास 47 बकऱ्यांना देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे गाव बंगळुरूपासून 127 किमी लांब तुमकुरू जिल्ह्यात आहे.

चिक्कनकानहल्ली तालुक्यात जवळपास 300 गावांची वस्ती असून, येथे जवळपास 1000  लोक राहतात. येथे मेंढपाळ आणि एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय 4 बकऱ्यांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर गावात भिती पसरली आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, काही बकऱ्यांना श्वास घेण्याची समस्या आहे.

जिल्ह्यातील आरोग्य व पशुसंवर्धन विभागाने गावाला भेट दिली. त्यांनी बकऱ्यांच्या स्वॅबचे नमुने घेतले आहेत व बकऱ्यांना गावाच्या बाहेर क्वांरटाईन करण्यात आले आहे. मृत बकऱ्यांचे पोस्ट मार्टम केले असून, बकऱ्यांचे नमुने इंस्टिट्यूट ऑफ एनिमल हेल्थ अँड वेटेनरी बायलॉजिकल्स, बंगळुरूला पाठवण्यात आले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर या बकऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही, ते समजेल.

Leave a Comment