ममता बॅनर्जी मोदींच्याही एक पाऊल पुढे, राज्यातील जनतेला वर्षभर देणार मोफत धान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करताना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा कालावधी नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाढवण्यात आला असल्याची माहिती दिली होती. आता यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषणा करत त्यांच्या राज्यात जून 2021 पर्यंत गरीबांना मोफत धान्य देणार असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केल्यानंतर काही वेळेतच ममता बॅनर्जी यांनी ही घोषणा केली. त्या म्हणाल्या की, पश्चिम बंगालमध्ये जून 2020 पर्यंत मोफत राशन दिले जाईल. याशिवाय राज्याच्या धान्याची गुणवत्ता ही केंद्राच्या राशनपेक्षा अधिक चांगली असते. बंगालमध्ये केवळ 60 टक्के लोकांपर्यंतच केंद्राचे राशन पोहचते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण योजनेचा विस्तार करत नोव्हेंबरपर्यंत गरीबांना धान्य मिळेल असे सांगितले आहे. दिवाळी आणि छठ पर्यंत 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळेल. यासाठी 90 हजार कोटी रुपये खर्च येईल.

Leave a Comment