भारतानंतर अमेरिकेने दिला चीनला झटका, या कंपन्यांवर घातली बंदी

चीनला जगभरातील देशांशी असलेले शत्रुत्व आता महागात पडू लागले आहे. भारताने 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता अमेरिकेने देखील चीनला मोठा झटका दिला आहे. अमेरिकन सरकारने चीनच्या दोन मोठ्या कंपन्या देशाच्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. या कंपन्यांमध्ये ह्युवाई टेक्नोलॉजी आणि झेटीई कॉर्पचा समावेश आहे. आता अमेरिकेत या दोन कंपन्यांच्या व्यवसायावर बंदी घालण्यात आली आहे.

अमेरिकेच्या फेडरल कम्यूनिकेशन कमिशनने 5-0 मतांच्या आधारावर या कंपन्यांना धोकादायक ठरवले आहे. अमेरिकेने या कंपन्यांसोबत सामान खरेदीसाठी 8.3 बिलियन डॉलर्सचा करार देखील केला होता. मात्र आता हे करार थांबविण्यात आले आहेत. अमेरिकेचे एफसीसी चेअरमन अजित पाई म्हणाले की, आमच्या कम्यूनिकेशन इंफ्रास्ट्रक्चरला नुकसान पोहचेल, त्यामुळे आम्ही चीनी कंपन्यांना आमचे नेटवर्क वापरण्यास देऊ शकत नाही.

अमेरिकेच्या सरकारने या आधी देखील ह्युवाई सोबतच्या वादानंतर कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकले होते. भारतात देखील ह्युवाई कंपनीवर संकट कायम आहे. कंपनी 5जी नेटवर्क वाटपामध्ये दावेदार आहे.

Leave a Comment