संतापजनक! मास्क घालण्यास सांगितल्याने अधिकाऱ्याने केली महिलेला मारहाण

आंध्र प्रदेशच्या नेल्लौर येथील पर्यटन विभागाच्या एका अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. महिलेने अधिकाऱ्याला मास्क घालण्याचा सल्ला दिला होता, यामुळे भडकलेल्या महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केली. हा संपुर्ण प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे.

सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, कशाप्रकारे अधिकारी महिलेला मारहाण करत आहे. पीडित महिला दिव्यांग आहे. डेप्यूटी मॅनेजर असलेला सी भास्कर दिव्यांग महिला उषा यांनी केस धरून ओढत आहे व लोखंडी रॉडने मारहाण करत आहे. यावेळी तेथे उपस्थित असलेले इतर लोक मध्यस्थी करत व्यक्तीला थांबवतात.

दर्मामिट्टाचे उप-पोलीस निरिक्षक वेणुगोपाल यांनी सांगितले की, व्यक्तीला अटक करण्यात आले असून, न्यायालयीन कस्टडीमध्ये पाठविण्यात आले आहे. व्यक्तीच्या विरोधात कलम 354, कलम 355, कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment