आज संध्याकाळी 4 वाजता देशाला संबोधित करणार पंतप्रधान


नवी दिल्ली : आज संध्याकाळी 4 वाजता देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. पण, मोदी आज बोलताना कोणत्या विषयावर जनतेला संबोधित करणार हे अद्याप समजलेले नाही. पण, असे म्हटले जात आहे की, मोदी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर जनतेशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर असा अंदाज बांधण्यात येत आहे की, सध्या भारत-चीन यांच्यातील वाढत्या तणावांबाबतही पंतप्रधान काही गोष्टी स्पष्ट करू शकतात.

यासंदर्भातील माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅन्डलवरून ट्विट करू देण्यात आली असून, त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 4 वाजता देशाला संबोधित करणार आहेत.


दरम्यान मोदींच्या संबोधनाआधी भारत सरकारच्या वतीने एक अत्यंत महत्त्वापूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. सरकारच्या वतीने काल (सोमवारी) संध्याकाळी 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राउजर यांसारख्या अनेक मोठ्या आणि लोकप्रिय चिनी अॅप्सचा समावेश आहे. या अॅप्सवर आयटी अॅक्ट 2000 अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे.

तर दूसरीकडे भारत आणि चीन यांच्यामध्ये आज कमांडर स्तरावर तिसऱ्या टप्प्यात चर्चा होणार आहे. ही बैठक सकाळी साडेदहा वाजता सुरु होईल आणि यामध्ये दोन्ही देशांमधील एलएसीवर तणाव कमी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येईल. याव्यतिरिक्त सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत हिंदी महासागरात गस्त वाढवणार आहे. त्याचबरोबर असे सांगण्यात येत आहे की, चीनला यातून संदेश दिला जात आहे की, भारत आपल्या सीमांवर पूर्णपणे सतर्क आहे.

Leave a Comment