मागील 10 वर्षांपासून ही पुणेकर महिला विना माती उगवत आहे फळे-पालेभाज्या

तुम्ही कधी मातीशिवाय फळे, पाले-भाज्या उगवण्याचा विचार केला आहे का ? नाही ना. मात्र पुण्यातील नीला रेनाविकर पंचपोर या मागील 10 वर्षांपासून बिना मातीचे पाले-भाज्या, फळे उगवत आहेत. नीला या कॉस्ट अकाउंटेंट आणि मॅरोथॉन रनर आहेत. आपल्या टेरेस गार्डनलाच त्यांनी शेतीचे स्वरूप दिले आहे. त्या सुकलेली पाने, कचरा आणि शेणापासून आपल्या झाडांसाठी खत तयार करतात.

Image Credited – thebetterindia

नीला यांच्यानुसार, मातीशिवाय हे खत पानांमुळे अधिक काळ ओलावा टिकून ठेवतात. झाडं चांगली राहतात. नीला म्हणाल्या की, मी यासाठी कोणत्याही खास तंत्रज्ञानाची मदत घेत नाही. यासाठी केवळ मेहनत आणि वेळ द्यावा लागतो.

Image Credited – thebetterindia

द बेटर इंडियाच्या रिपोर्टनुसार, नीला यांना पर्यावरणाची आवड आहे. किचनमध्ये राहणाऱ्या वेस्टचे काय करायचे हे त्यांना समजत नसे. म्हणून त्यांनी आपल्या मित्राची खत तयार करण्यासाठी मदत घेतली. यानंतर त्या किचनमधील वेस्टपासून खत तयार करू लागल्या. त्यांनी इंटरनेटवर मातीशिवाय झाडे उगवण्याचे तंत्र शिकले. काही दिवसांनी त्यांनी आपल्या घरातच खत तयार करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी एका डब्ब्यात सुकलेली पाने, शेण आणि प्रत्येक आठवड्याचे किचनचे वेस्ट त्यात टाकले. याद्वारे एका महिन्यात खत तयार होते.

सुरुवातीला त्यांनी खत बादली टाकून काकडीचे उत्पादन केले. 40 दिवस दररोज पाणी टाकल्यावर त्यांना याचे चांगले परिणाम देखील दिसून आले. यानंतर त्यांनी मिर्ची, टोमॅटो आणि बटाट्याचे देखील उत्पादन केले. त्या जुने डब्बे, प्लास्टिकच्या भांड्यात झाडे लावतात. त्यांच्या गार्डनमध्ये असे 100 डब्बे आहेत. या गार्डनमध्ये उगलेली फळे, पाले-भाज्या त्या आपल्या मित्रांना देखील देतात. आपल्या ट्रिक्स शेअर करण्यासाठी त्यांनी ऑर्गेनिक गार्डनिंग नावाने फेसबुक ग्रुप देखील तयार केला आहे. या ग्रुपशी आतापर्यंत 40 हजारांपेक्षा अधिक सदस्य जोडले गेले आहेत.

Leave a Comment