मोदींच्या भाषणावर राहुल गांधींचा काव्यात्मक टोला


नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या आणखीनच वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक २च्या निमित्ताने आज देशातील नागरिकांशी संवाद साधला. नरेंद्र मोदींनी यावेळी केलेल्या संबोधनात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना ते गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या सर्व योजनांबद्दल मोदींनी माहिती दिली. मोदींनी यावेळी बोलत असताना अनलॉक १ पासून लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढला असून, सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन होताना दिसत नसल्याची खंत मोदींनी व्यक्त केली.


त्यातच भारत आणि चीन सैन्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गलवान खोऱ्यात संघर्ष सुरु आहे. त्यातच टीक-टॉकसह ५९ चिनी अॅपवर केंद्र सरकारने बंदीही घातली. गलवाण खोरे आणि नजीकच्या भागात आजही चिनी सैन्याच्या कुरापती सुरुच आहेत. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले होते. दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदींच्या भाषणानंतर एक जुना शेर आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत मोदींना टोला लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. भारताचा चीनने बळकावलेला भूभाग आणि २० भारतीय जवांना पत्करावे लागलेले हौतात्म्य यावरुन राहुल गांधींनी मोदी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.

Leave a Comment