पृथ्वीराज चव्हाणांनी केली नमो अ‍ॅपवर पण बंदी घालण्याची मागणी


मुंबई – केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69 अ अंतर्गत देशाचे सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचे हित लक्षात घेत 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय काल संध्याकाळी घेतला आहे. चिनी अॅप्सवर आता बंदी घालण्यात आली असली तरी, भारतातील चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेअंतर्गत आधीपासूनच अनेकांनी मोबाइलमधून चिनी अॅप्स रिमूव्ह करण्यास सुरूवात केली होती.


दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नमो अ‍ॅपवरही बंदी घाला अशी मागणी केली आहे. १३० कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात असल्यामुळे सरकारने ५९ चिनी मोबाइल अ‍ॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकरर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खासगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्याचा डेटा भारताबाहेरच्या परदेशातील कंपन्यांना पाठवणारे नमो अ‍ॅपही बंद केले पाहिजे, अशा संदर्भातील ट्विट त्यांनी केले आहे. त्याचबरोबर त्यांनी #BanNaMoApp हा हॅशटॅगही ट्रेंड केला आहे.

Leave a Comment