क्वारंटाईनचा कालावधी पुर्ण करणाऱ्यांना हे राज्य सरकार देणार 2 हजार रुपये

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत चालला आहे. प्रत्येक राज्य सरकार नागरिकांनी क्वारंटाईनचा कालावधी पुर्ण करावा याकडे विशेष जोर देत आहे. बाहेरील राज्यातून आलेल्या नागरिकांना 14 दिवस प्रत्येक राज्य क्वारंटाईन करत आहे. यातच आता ओडिशाने नागरिकांनी क्वारंटाईनचा कालावधी कोणताही हलगर्जीपणा न करता योग्यरित्या पुर्ण करावा यासाठी खास पाऊल उचलले आहे. ओडिशा सरकार आता क्वारंटाईनचा नियमित कालावधी पुर्ण केल्यानंतर घरी परतणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 1 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देणार आहे.

ओडिशामध्ये डब्ल्यूएचओ आणि केंद्र सरकारच्या कोरोनाशी लढण्यासाठी जारी केलेल्या दिशानिर्देशांचे सक्तीने पालन केले जात आहे. देशभरात अनलॉक 1.0 लागू केल्यानंतर देखील राज्यात काही विशेष गोष्टींनाच सूट देण्यात आलेली आहे.

बाहेरून आलेल्या व्यक्तीने 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पुर्ण करावा यासाठी प्रेरणा म्हणून सरकार 2 हजार रुपये नागरिकांना देत आहे. क्वारंटाईन कालावधी पुर्ण करून परताना प्रत्येक व्यक्तीला ही रक्कम दिली जाईल. जाजपूर जिल्ह्यातील अशा 144 लोकांच्या खात्यात रक्कम जमा देखील करण्यात आली आहे.

दरम्यान, ओडिशामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 हजारांच्या पुढे गेला आहे. मात्र चांगली गोष्टी अशी की येथील जवळपास 5 हजार कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment