ट्रम्प विरोधात अटक वॉरंट, इंटरपोलकडे इराणने मागितली मदत

इराणने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह 35 लोकांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. सोबतच या प्रकरणात इंटरपोलची मदत मागितली आहे. या संदर्भात इराणचे सरकारी वकील अली अल-कासिम मेहर यांनी माहिती दिली आहे. इराणने हे वॉरंट सैन्य कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येच्या आरोपाखाली जारी केले आहे.

इराणच्या कुदस सैन्याचे प्रमुख जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने ईराकची राजधानी बगदाद येथे ड्रोन हल्ल्यात ठार केले होते. अमेरिकेचे म्हणणे आहे की अखाती देशांमधील अमेरिकेच्या सैन्य ठिकाणांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांच्या मागे जनरल कासिम सुलेमानीचा हात होता.

बीबीसीच्या वृत्तानुसार, इराणचे सरकारी वकील अल-कासिम मेहर यांनी म्हटले की, अटक वॉरंट हत्या करणे व अतिरेकी कारवाईमध्ये सहभागी असणे या आरोपा अंतर्गत जारी करण्यात आले आहे. इराणने इंटरपोलला ट्रम्प आणि इतरांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याचे अपील केले आहे. अल-कासिम मेहर म्हणाले की, ट्रम्प यांचा कार्यकाळ संपल्यानंतर देखील इराण या प्रकरणात मागे हटणार नाही.

Leave a Comment