कोरोनावरील पहिली देशी लस तयार, जुलैमध्ये होणार मानवी चाचणी

लाखो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कोरोना व्हायरसवरील लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने कोव्हिड-19 वरील पहिली लस ‘कोवॅक्सीन’ तयार केली आहे. या लसीला भारत बायोटेकने तयार केले आहे. विशेष म्हणजे या लसीचे मानवी चाचणी करण्यास देखील परवानगी मिळाली असून, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआयने) ही परवानगी दिली आहे.

भारत बायोटेक ही हैदराबादची फार्मा कंपनी आहे. या कंपनीने कोरोनावरील लस बनवल्याचा दावा केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की कोवॅक्सीनच्या मानवी चाचणीसाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी परवानगी मिळाली आहे. चाचणी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. या आधी कंपनीने पोलिओ, रॅबिज, रोटाव्हायरस, जपानी इनसेफ्लाइटिस, चिकनगुनिया आणि जिका व्हायरसवरील लस देखील बनवली आहे.

कोरोना व्हायरसशी संबधित सार्स-कोव्हिड-2 स्ट्रेनला पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीने (एनआयव्ही) वेगळे केले होते. यानंतर स्ट्रेनला भारत बायोटेकला ट्रांसफर केले. हैदराबादच्या जिनोम व्हॅली येथील अति सुरक्षित लॅबच्या बीएसएल-3 मध्ये बनविण्यात आले आहे. कंपनीने या संदर्भातील प्री-क्लिनिकल स्टडीज आणि इम्यून रिस्पॉन्सचा अहवाल सरकारला सोपवला आहे.

Leave a Comment