बापरे! कोरोनावर प्रभावी ठरलेल्या ‘या’ औषधाची किंमत आहे तब्बल 1.76 लाख रुपये

कोरोना व्हायरसमुळे चिंतेत असलेल्या रुग्णावर आता औषध कंपन्या अधिक ओझे टाकण्याच्या तयारीत आहेत. कोव्हिड-19 वरील उपचारासाठी आतापर्यंत सर्वाधिक परिणामकारक ठरलेल्या रेमडेसिव्हिरची किंमत प्रती रुग्ण तब्बल 2340 डॉलर्स (जवळपाळ 1.76 लाख रुपये आहे. रेमेडेसिव्हिर औषध बनवणारी कंपनी जिलिड्स सायन्सेंजने म्हटले आहे की, ही किंमत श्रीमंत देशातील रुग्णांसाठी असून, ही किंमत पाच दिवसांच्या डोससाठी आकारली जात आहे.

Image Credited – aajtak

जिलिड्स पुढील तीन महिन्यात रेमडेसिव्हिरचा संपुर्ण साठा अमेरिकाला पाठवणार आहे. कंपनीनुसार, कमर्शियल विमा काढलेल्या अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांकडून एका कोर्ससाठी 3120 डॉलर्स (जवळपास 2.30 लाख रुपये) किंवा एका कुपीसाठी (औषधाची छोटी बाटली) 530 डॉलर (जवळपास 40 हजार रुपये) घेणार आहे.

Image Credited- Express Pharma

कंपनीनुसार, अमेरिकेच्या हेल्थ केअर प्रोग्राम अंतर्गत रुग्णांचा उपचार होत असल्याने एका कुपीसाठी 390 डॉलर यासाठी वाढवण्यात आले आहेत. जिलिड्सचे चीफ एग्झिक्यूटिव्ह डॅनियल ओडे म्हणाले की, जर रुग्ण योग्य वेळेत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यास अमेरिकेचे प्रत्येकी रुग्णांमागे 12 हजार डॉलर वाचतील

Image Credited – indiatv

अमेरिकेच्या हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिसेजने सांगितले की, त्यांनी 5 लाख रेमडेसिव्हिरचे कोर्सेज हॉस्पिटलमध्ये पोहचवले आहेत. जिलिड्स आपल्या उत्पादनाचा 90 टक्के हिस्सा सप्टेंबरपर्यंत अमेरिकेला पाठवेल.

Leave a Comment