अ‍ॅप्सवर बंदी; अश्विनने टीक-टॉक स्टार डेव्हिड वॉर्नरला फिल्मी अंदाजात केले ट्रोल

सरकारने 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. या अ‍ॅपमध्ये भारतात लोकप्रिय असणारे टीक-टॉक अ‍ॅप देखील आहे. यावर बंदी घातल्यानंतर आता भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला ट्रोल केले आहे. कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट स्पर्धा बंद असल्याने वॉर्नरने फावल्या वेळेत भारतीय गाण्यांवर अनेक टीक-टॉक व्हिडीओ शेअर केले होते.

टीक-टॉकवर आपल्या पत्नी व मुलांसह मजेशीर व्हिडीओ शेअर करणाऱ्या वॉर्नरला भारतीय नेटकऱ्यांकडून देखील भरपूर प्रेम मिळाले. मात्र आता टीक-टॉकवर बंदी आल्याने अश्विनने ट्विटरद्वारे वॉर्नरची फिल्मी अंदाजात मस्करी केली. अश्विनने वॉर्नरला टॅग करत लिहिले की, अप्पो अनवर ? हा सुपरस्टार रजनीकांत यांच्या 1995 मध्ये आलेल्या मणिक बाशा चित्रपटाती डायलॉग आहे. याचा अर्थ होतो आता डेव्हिड वॉर्नर काय करणार ?

भारतात टीक-टॉकवर बंदी घातल्याने भारतीय चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाला वॉर्नर नक्कीच मिस करेल. वॉर्नरने अनेक भारतीय गाण्यांवर आपले व्हिडीओ शेअर केलेले आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे मानत 59 चीनी अ‍ॅपवर बंदी घातली आहे. यामध्ये टीक-टॉकसह व्हीचॅट, यूसी ब्राउजर,माईमाई कम्यूनिटी, शेअरइट, हेलो या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

Leave a Comment