धक्कादायक! चीनमध्ये आढळला नवीन व्हायरस, पसरवू शकतो महामारी

कोरोना व्हायरसचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यातच आता चीनमध्ये एक नवीन व्हायरस आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनच्या वैज्ञानिकांनुसार या व्हायरसमुळे महामारी पसरण्याची शक्यता अधिक आहे. फ्लूवरील सध्याची लस या व्हायरसच्या विरोधात मानवी शरीराचे रक्षण करण्यास सक्षम नाही. डुक्करांमध्ये सापडलेला हा व्हायरस मनुष्याला संक्रमित करू शकतात.

Image Credited – India TV

या नव्याने सापडलेल्या व्हायरसचे नाव G4 EA H1N1 आहे. हा व्हायरस 2009 साली आलेल्या स्वाइन फ्लूचा अनुवंशिक वंशज असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हायरस मनुष्यापासून मनुष्यामध्ये वेगाने पसरण्याची वैज्ञानिकांना भिती आहे. G4 EA H1N1 हा व्हायरस संपुर्ण जगात महामारी निर्माण करू शकतो.

Image Credited – .moneycontrol

या फ्लू व्हायरसमध्ये सर्व लक्षण आहेत, ज्याद्वारे मनुष्याला संसर्ग होऊ शकतो. चीनी वैज्ञानिकांनुसार, हा व्हायरस नवीन असल्याने लोकांमध्ये एकतर रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी असेल अथवा काहीच नसेल. या नवीन व्हायरसमध्ये स्वतःच्या पेशी अनेक पटींनी वाढविण्याची क्षमता आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment