छगन भुजबळ यांची घोषणा; नाशिकमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी


नाशिक – पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. लॉकडानच्या नियमांचे सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कडक पालन केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये कारोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितले की, सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नाशिकमध्ये लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्ह्यात या वेळेत कर्फ्यूसदृश्य परिस्थिती असेल. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश जगदाळे या बैठकीला उपस्थित होते.

Leave a Comment