कोरोनाची उत्पत्ती जाणून घेण्यासाठी चीनला जाणार डब्ल्यूएचओची टीम

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस चीनच्या वुहान शहरातून सर्वत्र पसरल्याचे आतापर्यंत सांगितले जात आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) एक टीम खरंच चीनमध्ये कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली का ? व याच्या स्त्रोताची माहिती घेण्यासाठी चीनला जाणार आहे. डब्ल्यूएचओनुसार कोरोना व्हायरस कोठून आला हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडहनॉम गिब्रयेसॉस म्हणाले की, जेव्हा आपल्याला व्हायरसबाबत सर्वकाही माहिती असेल तेव्हा त्याच्याशी योग्यरित्या सामना करता येईल. पुढील आठवड्यात एक टीम चीनला पाठवणार असून, याद्वारे व्हायरसच्या उत्पत्तीची माहिती मिळण्याची आम्हाला आशा आहे. या टीममध्ये कोण असेल हे मात्र गिब्रयेसॉस यांनी स्पष्ट केले नाही.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की व्हायरस प्राण्यांमधून मनुष्यामध्ये पसरला आहे. चीनच्या वुहान शहरातील मांस विक्री करणाऱ्या बाजारातून हा पसरला असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी चेतावणी देखील डब्ल्यूएचओने दिली आहे.

Leave a Comment