एका क्लिकवर मुंबईतील 750 कंटेनमेंट झोन्सची यादी


मुंबई – देशात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या महाराष्ट्रात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पण या आकडेवारीत मुंबईतील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईत 750 कंटेनमेंट झोन्स जाहीर करण्यात आले आहेत. मुंबईत काल नव्याने 1 हजार 247 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 21 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 76 हजार 294 वर पोहचली आहे. यापैंकी 4 हजार 461 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 43 हजार 545 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, महाराष्ट्रातील लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी मिशेन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात देण्यात आलेल्या सवलतींसह 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. तसेच मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी 750 कंटेनेमेंट झोन्स जाहीर करण्यात आले आहेत.

750 कंटेनेमेंट झोन्सची पूर्ण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Containment-Zones

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधताना लॉकडाऊन पूर्णपणे संपवणे तर सध्या शक्य नाही, पण 30 जून नंतर मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात उद्योग, व्यवसाय आणि खाजगी कार्यालये सुद्धा हळू हळू सुरु केली जाणार असे सांगितले होते. पण यावेळी आपण बेसावध राहून चालणार नाही, काळजी घेतली नाही गर्दी झाली तर पुन्हा संसर्ग पसरेल आणि पूर्ण लॉकडाऊन करण्याला पर्याय उरणार नाही, असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

Leave a Comment