… म्हणून येथे चक्क अस्वलाला देण्यात आली मृत्यूदंडाची शिक्षा

इटलीमध्ये एका अस्वलाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मागील आठवड्यात या अस्वलाने ट्रेंटिनो येथे हायकिंग करण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्रांवर जीवघेणा हल्ला केला होता. यामुळे अस्वलाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

59 वर्षीय फेबिओ मिस्सरोनी हे मुलगा ख्रिश्चियन मिस्सरोनीसह माउट पेलरच्या रस्त्याने जात असताना, या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. ख्रिश्चियनने सांगितले की, अस्वलाने त्याचा पाय दाबला. अस्वलाच्या तावडीतून सोडण्यासाठी वडिलांनी त्याच्यावर उडी घेतली. या सर्व घटनेत वडिलांना तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे.

या हल्ल्यानंतर आता ट्रेटिनोचे गव्हर्नर मॉरिझिओ फुगाट्टी यांनी अस्वलाला पकडण्याच्या आणि मारण्याच्या आदेशावर सही केली आहे. अधिकार पिता-पुत्राच्या जखमीवरील लाळ आणि कपड्यांवरील फरच्या डीएनएद्वारे अस्वलाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मात्र प्राणी हक्क संघटना आणि कार्यकर्त्यांनी या निर्णयावर टीका केली आहे. इटलीच्या वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडच्या शाखेने या विरोधात एक ऑनलाईन पेटिशन देखील सुरू केले आहे. इटलीचे पर्यावरण मंत्री देखील या निर्णयाच्या विरोधात आहेत. ते म्हणाले की, कदाचित मादा आपल्या बाळाचे रक्षण करत असावी.

Leave a Comment