वैज्ञानिकांनी शोधले पृथ्वीसारखे दोन ग्रह, जीवन असण्याची शक्यता

वैज्ञानिकांना अंतराळात पृथ्वीसारख्या दोन ग्रहांचा शोध लावला आहे. दोन्ही ग्रहांवर जीवन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे दोन्ही ग्रह पृथ्वीशी साम्य असणारे आहेत. यांचे अंतर 11 प्रकाश वर्ष असून वैज्ञानिकांनी सांगितले की, या सुपर अर्थचे नाव ग्लिस 887 आणि ग्लिसे 887 बी ठेवण्यात आले आहे. हे दोन्ही ग्रह पृथ्वीपेक्षा आकाराने मोठे आहेत.

दोन्ही ग्रह यूरेनस आणि नेप्चूनच्या तुलनेत लहान आहेत. हे ग्रह सौरमंडळाच्या बाहेर सापडले असून, यूनिव्हर्सिटी ऑफ गॉटिंग्टनचे खगोलशास्त्रज्ञ सँड्रा जेफर्स यांनी याचा शोध लावला आहे. या संदर्भातील अहवाल सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

Image Credited – aajtak

सँड्रा यांच्यानुसार, हे ग्रह सौर मंडळाच्या बाहेर जीवन मान असण्याची शक्यता दर्शवतात. यांच्या अभ्यासाने खूप फायदा होईल. स्पेक्ट्रोग्राफचा उपयोग करून त्यांच्या टीमने या प्रणालीचे निरक्षण केले. सँड्रा यांच्या टीमने ग्लिसे 887 वरील जवळपास 20 वर्षांच्या डेटाचे देखील विश्लेषण केले. दोन्ही ग्रहांची कक्षेत फिरण्याची गती जास्त आहे. बुध ग्रहाच्या तुलनेत देखील हे अधिक वेगाने फिरतात.

Image Credited – aajtak

या ग्रहांवर द्रव स्वरूपात पाणी असण्याची देखील शक्यता आहे. हे दोन्ही ग्रह मंगळ व पृथ्वीसारखे खडकाळ ग्रह देखील असू शकतात. येथे जीवनाची शक्यता आहे. मात्र वैज्ञानिक याचा अजून अभ्यास करत आहेत. जेणेकरून या ग्रहांवर जीवन शक्य असल्याची पुष्टी होऊ शकेल.

Leave a Comment