सुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी भूमी पेडणेकर करणार हे काम

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने त्याच्या चाहत्यांसह सहकलाकारांना देखील मोठा धक्का बसलेला आहे. आपल्या अभिनयाने सुशांतचे अनेकांच्या मनावर छाप सोडली आहे. आता सुशांतला श्रद्धांजली देण्यासाठी ‘सोन चिडिया’ चित्रपटात त्याची सहकलाकार असलेल्या अभिनेत्री भूमी पेडणेकरने 550 वंचित कुटुंबाना अन्न देण्याचा निर्णय घेतला आहे. इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने याबाबत माहिती दिली.

View this post on Instagram

🙏 . . . @eksaathfoundation

A post shared by Bhumi✨ (@bhumipednekar) on

भूमी पेडणेकरच्या या निर्णयाने तिचे चाहते खूष झाले आहेत. भूमीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, मी माझा प्रिय मित्र सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत एका संस्थेसोबत मिळून 550 गरीब कुटुंबाना अन्नदान करण्याची प्रतिज्ञा घेते. प्रत्येक गरजू व्यक्तीच्या प्रती दया आणि प्रेम दर्शवू.

भूमीने सुशांतचा आगामी चित्रपट ‘दिल बेचारा’चे पोस्टर देखील आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले होते. दोन्ही कलाकारांनी सोन चिडिया या चित्रपटात एकत्र काम केले होते.

Leave a Comment