चीनला उत्तर देण्यास भारत सज्ज, 27 जुलैपर्यंत 6 राफेल विमाने भारतात होणार दाखल

भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आता फ्रान्सवरून सहा राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी 27 जुलैपर्यंत भारतात पोहचणार असल्याचे सांगितले जात आहे. ही लढाऊ विमाने मे महिन्यात भारतात दाखल होणार होती, मात्र कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे भारताला मिळू शकली नाहीत.

अमर उजालाच्या वृत्तानुसार, फ्रान्सवरून उड्डाण घेतल्यानंतर ही विमाने अंबाला शहरातील एअर फोर्स स्टेशनवर लँड होतील. भारत-चीनमध्ये सीमावादाच्या पार्श्वभूमीवर ही लढाऊ विमाने भारतात पोहचणार असल्याने याला महत्त्व आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांशी देखील चर्चा केली होती.

संरक्षण मंत्रालयाने सांगितले होते की, दोन्ही मंत्र्यांनी प्रादेशिक सुरक्षा परिस्थितीवर चर्चा केली आणि द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करण्यास सहमती दर्शविली होती. दरम्यान, भारताने सप्टेंबर 2016 मध्ये 36 लढाऊ राफेल विमानासाठी फ्रान्ससोबत 60 हजार कोटी रुपयांचा करार केला आहे.

Leave a Comment