तापसीनंतर रेणुका शहाणेंना आले भरमसाठ वीज बिल, ट्विटरवर व्यक्त केला संताप

लॉकडाऊनंतर आता नागरिकांनी वीज बिल घरपोच मिळू लागले आहे. मात्र या काळात नागरिकांना सर्वसाधारपणपेक्षा दुप्पट वीज बिल येत आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांना देखील असाच अनुभव आला आहे. शहाणे यांना मे महिन्यात वीजेचे बिल 5510 रुपयांवरून थेट 18080 रुपये आले आहे. यावर आता ट्विट करत शहाणे यांनी अदानी इलेक्ट्रिसिटीला ट्विट करत प्रश्न विचारला आहे.

रेणुका शहाणे यांनी जास्त आलेल्या बिलाबाबत ट्विट करत लिहिले की, प्रिय अदानी इलेक्ट्रिसिटी मला 9 मे ला 5,510 रुपयांचे वीज बिल मिळाले. तर जून महिन्यात मे आणि जून या दोन्ही महिन्यांचे मिळून 29,700 रुपये वीज बिल आहे. यात तुम्ही मे महिन्यात जवळपास 18,080 रुपये चार्ज केले आहेत. मात्र 5,510 रुपये 18,080 रुपये कसे होऊ शकतात ? रेणुका शहाणे यांनी या ट्विटसोबत बिलाचे फोटो देखील शेअर केले.

दरम्यान, रेणुका शहाणे जास्त बिल आल्यामुळे वैतागलेल्या एकट्याच अभिनेत्री नाही. दुसरीकडे अभिनेत्री तापसी पन्नूने देखील अदानी इलेक्ट्रिसिटीला हाच प्रश्न ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे. तापसीला ज्या घराचा वापर करत नाही, अशा घराचे बिल 36 हजार रुपये आले आहे. माझ्या नकळत कोणी घराचा वापर तर करत नाही ना ? अशी चिंता देखील तिने ट्विटरवर व्यक्त केली.

Loading RSS Feed

Leave a Comment