‘विदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही’, प्रज्ञा ठाकूर यांचा राहुल गांधींवर निशाणा

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे वादात अडकण्याची शक्यता आहे. विदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. भोपाळ येथील एका कार्यक्रमा दरम्यान राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करत प्रज्ञा ठाकूर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.

चाणक्यचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, चाणक्य  म्हणाले होते की देशाच्या मातीत जन्मलेली व्यक्तीच देशाचे रक्षण करू शकते. जर तुमच्याकडे दोन देशांचे नागरिकत्व असल्यास तुम्ही केवळ एका देशाप्रतीच देशभक्ती दाखवू शकतात.

ठाकूर म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष नैतिकता आणि देशभक्ती सारख्या मुल्यांपासून लांब आहे. चीनसोबतच्या सीमावादावरून काँग्रेसवर टीका करत ठाकरू म्हणाल्या की, काँग्रेसने स्वतःचे आत्मपरिक्षण करावे. त्यांनी माहिती नाही की संकटाच्या काळात कसे बोलावे. यावरून स्पष्ट दिसते की, काँग्रेस नैतिकता आणि देशभक्ती सारख्या मुल्यावरून दूर आहे.

ठाकूर यांच्या टीकेवर काँग्रेसचे प्रवक्ते जेपी धनोपिया म्हणाले की, प्रज्ञा ठाकूर यांनी खासदार पदाचा अपमान केला आहे. त्या स्वतः दहशतवादी प्रकरणात सहभागी होत्या. त्या मानसिकरित्या अस्थिर झाल्या असून, भाजपने त्यांचा उपचार करावा.

Leave a Comment