नासा देत आहे 26 लाख रुपये, पुर्ण करावे लागेल हे चॅलेंज

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने एक चॅलेंज दिले असून, हे चॅलेंज पुर्ण करणाऱ्याला तब्बल 26.08 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. अंतराळात आणि चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीरांसाठी टॉयलेट डिझाईन करण्याचे चॅलेंज आहे. जे तीन डिझाईन सर्वोत्तम असतील त्यांना ही रक्कम दिली जाईल. अंतराळात अथवा चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीरांना अत्याधुनिक टॉयटेलची गरज पडते. हे टॉयलेट वजनाला हलके व रिसायकलिंगसाठी सर्वोत्तम असेल. नासाचे हे चॅलेंज पुर्ण केल्यास लाखो रुपयांचे बक्षीस मिळेल.

Image Credited – Aajtak

नासाला आपल्या अंतराळवीरांसाठी बाथरूम संबंधी समस्येवर समाधान हवे आहे. 1975 मध्ये अपोलो मिशनच्या समाप्तीनंतर इंजिनिअर्सनी मलमूत्र विसर्जनाला अंतराळ प्रवासासाठी मोठे आव्हान असल्याचे म्हटले होते. जी व्यक्ती सर्वोत्तम डिझाईन तयार करेल, त्या व्यक्तीला 15 लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या व्यक्तीला 7.60 लाख आणि तिसऱ्या व्यक्तीला 3.80 लाख रुपये पुरस्कार मिळेल.

Image Credited – Aajtak

नासा वर्ष 2024 मध्ये चंद्राच्या मिशनवर पहिल्यांदाच महिलेला पाठवणार आहे. अशा स्थितीमध्ये यूनिसेक्स टॉयलेटची गरज पडेल. डिझाईन पाठविण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट आहे. ऑक्टोंबर महिन्यात याचा निकाल जारी केला जाईल. हे टॉयलेट असे असावे, जे मायक्रोग्रॅव्हिटी आणि लूनर ग्रॅव्हिटीमध्ये काम करेल. नासाने या चॅलेंजला लूनर लू असे नाव दिले आहे.

Leave a Comment