जाणून घ्या चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी सीमेवर तैनात केलेल्या क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये

चीनसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने अत्याधुनिक आकाश क्षेपणास्त्र सीमेवर तैनात केले आहे. चीनी लढाऊ विमानांना एलएसीवर घिरट्या घालताना पाहण्यात आल्यानंतर भारताने हे पाऊल उचलले आहे. आकाश क्षेपणास्त्र जगातील मोजक्या सर्वोत्तम क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. या क्षेपणास्त्राविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

  • आकाश क्षेपणास्त्र एका मध्यम अंतरावरून हवेत मारा करू शकते. याची निर्मिती सुरक्षा संशोधन आणि विकास संस्थेने केली असून, याच्या उत्पादनाची जबाबदारी भारत डायनॉमिक लिमिटेडकडे आहे.
  • हे क्षेपणास्त्र 30 किमीच्या क्षेत्रात आकाशात 18,000 मीटर उंचीवर फिरणार्‍या कोणत्याही धोक्यास अचूकपणे लक्ष्य करण्यास सक्षम आहे. लढाऊ विमाने, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि एअर-टू-सरफेस क्षेपणास्त्रे तसेच बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करेल. डीआरडीओने भारतीय सैन्य आणि हवाई दलासाठी याची निर्मिती केली आहे.
  • आकाश क्षेपणास्त्राचे वजन 720 किलो आहे. त्याची रुंदी सुमारे 35 सेमी आणि लांबी 5.78 मीटर आहे. आकाश एक सुपरसोनिक क्षेपणास्त्र आहे. जे त्याच्या लक्ष्याकडे 2.5 ते 3.5 मॅकपर्यंत गतीने जाऊ शकते. या वेगाचा अर्थ असा आहे की क्षेपणास्त्र ताशी 4 हजार किमीपेक्षा वेगाने उड्डाण घेऊ शकते.
  • हे क्षेपणास्त्र 60 किलो स्फोटकांनी सज्ज आहे. याच्या प्रत्येक लाँचरमध्ये तीन क्षेपणास्त्रे आहेत. या क्षेपणास्त्राद्वारे अचूक निशाणा साधण्यासाठी रडारची देखील महत्त्वाची भूमिका आहे. यात थ्री डी कार रडार आहे.
  • आकाश क्षेपणास्त्राचा प्रोजेक्ट वर्ष 1990 मध्ये सुरू झाला होता. 7 वर्षात याची निर्मिती झाली होती. वर्ष 2005 मध्ये याची यशस्वी चाचणी पार पडली.

Leave a Comment