फेसबुकवर जाहिरातदारांनी टाकला बहिष्कार; परिणामी शेअरच्या किंमतीत घसरण


नवी दिल्ली : सोशल मीडियातील दिग्गज अशा फेसबुकवर द्वेष पसरविणाऱ्या आणि समाजातील फूट पाडणाऱ्या वाढत्या पोस्टचा फटका कंपनीला बसला आहे. त्यातच अनेक कंपन्यांनी फेसबुकवर जाहिरात न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे फेसबकुच्या शेअरच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

काही कंपन्यांनी फेसबुकवरून जाहिराती काढून घेतल्यामुळे ७.२ बिलियन डॉलरचा फटका मार्क झुकेरबर्ग यांना बसला आहे. शुक्रवारी या सोशल मीडिया कंपनीचे शेअर ८.३ टक्क्यांनी घटले. ब्लूमबर्ग बिलियन इंडेक्सनुसार, शेअरच्या किमती घसरल्याने फेसबुकचे बाजारमूल्य ५६ बिलियन डॉलरने घसरले आणि झुकेरबर्ग यांची एकूण संपत्ती ८२.३ बिलियन डॉलरच्या खाली गेल्यामुळे झुकेरबर्ग हे चौथ्या क्रमांकावर गेले आहेत.

Leave a Comment