संगीतकारांच्या मदतीसाठी या गायकाने सलग 64 दिवस गायले गाणे, जमवले 15 लाख रुपये

कोरोना व्हायरसमुळे लोक आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर काहींचे उद्योग-धंदे बंद पडले आहेत. अशा स्थितीमध्ये मात्र अनेकजण एकमेंकाची मदत करत आहे. या कठीण काळात लोकांमधील मानवता देखील समोर येत आहे. अशाच एका चेन्नईमधील गायकाने ऑनलाईन कॉन्सर्टच्या मदतीने 15 लाख रुपये जमवले आहेत.

प्लेबॅक गायक सत्यन महालिंगम यांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामद्वारे सत्यन उत्सव नावाचे अभियान सुरू केले. या अंतर्गत त्यांनी 65 दिवस ऑनलाईन कॉन्सर्ट करत 15 लाख रुपये निधी जमवला आहे. हा निधी म्यूझिक 4 म्यूझिशनन्स प्रोजेक्ट अंतर्गत जमा करण्यात आलेला आहे. याद्वारे म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांची मदत केली जाईल.

Image Credited – scoopwhoop

महालिंगम म्हणाले की, आधी एका महिन्यात 40 ते 45 कार्यक्रम करत असे. याद्वारे 50 हजारांपेक्षा अधिक कमाई होत असे. मात्र लॉकडाऊननंतर उत्पन्न शून्य झाले. त्यामुळे त्यांनी हे अभियान सुरू केले. इंडस्ट्रीमध्ये छोट्या संगीतकारांसाठी त्यांनी 30 मे रोजी सलग 25 तास गाणे गायले.

ते म्हणाले की, मी म्यूझिक इंडस्ट्रीमधून असल्याने येथे राहणे किती अवघड आहे. मी याची सुरूवात केली आहे. माझ्या उद्योगाला मी काहीतरी देण्यास सक्षम आहे.

Leave a Comment