प्रोफाईल फोटोमध्ये टीक-टॉकने लावला भारताचा झेंडा; नेटकऱ्यांचा संताप


नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात झालेल्या झटपटीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारत आणि चीनमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्यातच देशभरात चीनविरोधात संताप व्यक्त केला जात असून त्याचबरोबर चीनी वस्तू आणि अॅपवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. त्याचा फटका चीनी मोबाईल अॅपला देखील बसत आहे.

त्याचपार्श्वभूमीवर चीनच्या सगळ्यात लोकप्रिय अशा शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप टीक-टॉकने सर्व सोशल मीडियावर असलेल्या प्रोफाईलमध्ये भारतीय झेंड्याचा फोटो लावला आहे. याआधी फेसबुक आणि ट्विटरवर फक्त त्यांच्या प्रोफाइल फोटोमध्येच टीक-टॉकचा लोगो दिसत होता, पण या दोन्ही ठिकाणी आता लोगोच्या उजव्या बाजूला भारताचा झेंडादेखील दिसत आहे. पण टीक-टॉकचा हा केविलवाणा कारनामा भारतीय नेटकऱ्यांच्या पचनी पडलेला दिसत नाही, कारण टीक-टॉकने लोगोच्या ठिकाणी भारताचा झेंडा लावल्याने नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, देशात आधीपासूनच टीक-टॉकवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत प्रोफाईल फोटोवर भारताचा झेंडा लावल्याने नेटकरी चिडले आहेत. टीक-टॉकच्या ऑफिशिअल पेजवर 1.5 कोटी पेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत. शनिवारी संध्याकाळी अॅपचा प्रोफाईल फोटो बदलण्यात आला आहे. प्रोफाईल फोटोमध्ये टीक-टॉकने भारताचा झेंडा लावल्यामुळे नेटकरी प्रचंड चिडले आहेत. फेसबुकच्या प्रोफाईल फोटोवर बर्‍याच वापरकर्त्यांनी ‘RIP’ लिहून कमेंट्स केल्या आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment