जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा एक कोटींच्या पार, तर 5 लाखांहून अधिक मृत्यू


नवी दिल्ली : अवघ्या जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट अधिकच गडद होऊ लागले असून जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा एक कोटींच्या पार पोहचला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसची जगभरातील एक कोटी 74 हजार नागरिकांना झाली आहे, तर 5 लाखांवर आतापर्यंत मृत्यूंची संख्या पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरातील 54 लाखांहून अधिक लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्याचबरोबर कोरोनाची बाधा होण्याच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.

वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार भारत रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत जगात चौथ्या स्थानावर आला आहे. भारतात कोरानाचे 5,29,577 रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे 16,103 बळी गेले आहेत. सध्या भारतात 2,03,328 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 3,10,146 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील 24 तासात भारतात आतापर्यंतचे सर्वाधिक 19,906 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत तर 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका महासत्ता अमेरिकेले बसला असून अमेरिकेत 25,96,403 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर कोरोनामुळे 1,28,152 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 13,15,941 कोरोनाबाधित आहेत तर 57,103 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर यूकेत कोरोनामुळे 43,514 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तिथे कोरोनाबाधितांची संख्या 3,10,250 एवढी आहे. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत इटलीत 34,716 मृत्यू झाले आहेत. तर 2,40,136 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत, पेरु, इटली,इराण,मॅक्सिको हे दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा दोन लाखांच्यावर गेला आहे. तर अमेरिकेत एक लाखाहून अधिक बळी गेले आहेत. यूके, ब्राझील या देशांमध्ये 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळे झाला आहे.

Leave a Comment