सुशांतने यशराजसोबतचा करार ‘पानी’ चित्रपटाच्या मतभेदानंतर मोडला


मुंबई : ‘पानी’ हा चित्रपट यशराज फिल्म्सचे आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यात क्रिएटीव्ह मतभेदामुळे पूर्ण होऊ शकला नाही, ज्यामुळे सुशांत सिंह राजपूत यशराज फिल्म्सवर नाराज असल्याचा खुलासा पोलिसांना दिलेल्या जबाबात यशराजची कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनी केला आहे.

पोलिसांना याबाबत शानू शर्मा यांनी माहिती दिली की, सुशांत यशराजसोबतचा तिसरा चित्रपट ‘पानी’साठी खूप उत्सुक होता. हा चित्रपट बीग बजेट चित्रपट यशराजलाही बनवायचा होता. या चित्रपटाच्या पूर्वनिर्मितीसाठी यशराजने 4-5 कोटी रुपये खर्च ही केले. परंतु हा चित्रपट करण्यासाठी आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यात एकमत झाले नाही. या दोघांमध्ये चित्रपट विषय क्रिएटीव्ह डिफरन्समुळे हा चित्रपट बनू शकला नाही. सुशांत हा चित्रपट पूर्ण न झाल्यामुळे नाराज होता आणि यशराज फिल्म्स सोडण्याचा त्याने निर्णय घेतला.

पोलिसांनी शानू शर्माला कराराचा तिसरा चित्रपट न केल्यानंतर ही सुशांतला यशराजने जाण्याची परवानगी का दिली, असा सवाल केला असता शर्मा यांनी सांगितले की, आम्हाला यशराज सोडण्याची विनंती सुशांतने केली. हा विषय आम्हाला (यश राज) देखील जास्त ड्रॅग करायचा नव्हता. प्रत्येकाच्या संमतीने हा करार संपत होता, म्हणून यशराजांनी सुशांतवर तिसरा चित्रपट करण्याचा आग्रह धरला नाही आणि तो करारातून बाहेर पडला. परंतु शानू शर्मा यांच्या या वक्तव्याचे पोलीस अधिक बारकाईने परीक्षण करणार आहे, ज्यासाठी शानू शर्माला चौकशीसाठी पोलीस परत बोलवू शकतात. याबरोबरच या डीलमध्ये सामील असलेल्या इतर लोकांचीही स्टेटमेन्ट रेकॉर्ड केले जाणार आहे.

शानू शर्मा यांना जेव्हा विचारले गेले की यशराजचा चित्रपट सोडण्यास सुशांतने रियालाही सांगितले होते. यशराजवर सुशांत एवढा नाराज का होता की तो यशराजबरोबर स्वत:च नव्हे तर इतरांनाही काम नाही करण्याचे सल्ले देत होता. शानूने यावर सांगितले की यशराजशी सुशांत नाराज नव्हता. स्वत:च्या मर्जीने यशराजच्या कानट्रॅक्ट मधून सुशांत बाहेर पडला. यशराज आणि सुशांतमध्ये कोणते ही मतभेद, भांडण किंवा आर्थिक संबंधही राहिले नव्हते. शानू शर्मा यांनी पोलिसांना यशराजसाठी सुशांत सिंह राजपूतला तिनेच कास्ट केल्याचे सांगितले. शानू शर्मा यांनी पोलिसांना माहिती दिली ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘झलक दिखला जा’ नंतर सुशांत छोट्या पडद्यावर खूप लोकप्रिय झाला. ‘झलक दिखला जा’ रियालिटी शो दरम्यान मी त्याला यशराज साठी कास्ट केले.

पोलिसांना शानू शुर्मा यांनी सांगितले की, सुशांतला औरंगजेब चित्रपटासाठी यशराज कास्ट करणार होते. सुशांतला या चित्रपटात अर्जुन कपूरच्या भावाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. पण त्या चित्रपटासाठी यशराजने सुशांतला पाठविलेले मेल त्याने पाहिला नाही. सुशांत जेव्हा यशराजकडे परत आला, तेव्हा तो ‘काय पो चे’ चित्रपट करत होता, म्हणूनच यशराज यांनी नंतर सुशांतला ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटासाठी साइन केले. यशराजसाठी सुशांतने केलेला दुसरा चित्रपट ‘ब्योमकेश बक्षी’ होता. तिसरा म्हणजे 150 कोटींचा बजेट चित्रपट होता ‘पानी’जो बनू शकला नाही आणि यशराजसोबत सुशांतने आपला करार संपवला.

त्याचवेळी, जेव्हा शानूला पोलिसांनी विचारले की, सुशांतला यशराजबरोबर झालेल्या करारामुळे मोठा चित्रपट सोडावा लागला होता का? यावर शानूने सांगितले की, आपल्याकडे याबद्दल काही माहिती नाही किंवा आपण हे कधीही ऐकले नाही. शानू शर्माचे यशराज फिल्म्समध्ये मोठे स्थान आहे. रणवीर सिंग, अर्जुन कपूर यासारख्या मोठ्या स्टार्सला शानूने चित्रपटसृष्टीत ब्रेक दिला. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणार्‍या पथकाचे प्रमुख डीसीपी अभिषेक त्रिमुखे म्हणाले, आतापर्यंत 27 जणांची आम्ही चौकशी केली आहे, मुंबई पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक बाजूने तपास करत आहेत. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित बरीच मोठी नावे असून त्यांची चौकशी केली जात आहेत.

Leave a Comment