नेटकऱ्यांची अक्षय कुमार आणि सोनू सूदला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी


बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सोनू सूदला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात असून ही मागणी अनेक नेटकऱ्यांनी केल्यामुळे भारतरत्न ट्विटर ट्रेंड होताना दिसत आहे. अक्षय कुमार आणि सोनू सूदने कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये केलेली मदत पाहता नेटकऱ्यांनी त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्याची नेटकऱ्यांनी ट्विटरद्वारे मागणी केली आहे.


दरम्यान भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांना भारतरत्न देण्याची मागणी सुहेल सेठ यांनी ट्विटरवर केल्यानंतर #PVnarsimhaRao आणि भारतरत्न सोशल मीडियावर ट्रेंड सुरु झाला असल्याचे म्हटले. अक्षय कुमार आणि सोनू सूदला भारतरत्न देण्याची मागणी सध्या सोशल मीडियावर नेटकरी करत आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment