लॉकडाऊन; पुण्यात नववर-वधुच्या आईवडिलांसह वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल


पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी कोरोनाच्या संकटकाळात होणाऱ्या लग्न समारंभात फक्त 50 लोकांना परवानगी दिली आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमादरम्यान मास्क, सॅनिटायझर वापरायला सांगितले आहे. पण सद्यपरिस्थितीत तसे काही होताना दिसत नाही, कारण कोणतीही परवानगी घेता सर्वात जास्त मोरांची संख्या असलेल्या शांतता प्रिय गावात डीजेच्या तालावर कर्कश आवाजावर नवरदेव स्वतः आणि सोबत मित्रमंडळींना घेऊन ते देखील विना मास्क थिरकला. सोशल मीडियात या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवरा-नवरीच्या आई-वडिलांसह 20 ते 25 वऱ्हाडी मंडळीवर पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्याच्या मोराची-चिंचोली गावात ही घटना घडली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत नवरदेवासह ही सगळी मंडळी डिजेच्या तालावर थिरकताना दिसत आहेत. तर नवरदेवासह कोणीही मास्कचा वापर केलेला दिसत नाही, त्याचबरोबर यादरम्यान सोशल डिस्टन्सचा देखील फज्जा उडाला आहे. 25 जूनला गणेश आप्पासाहेब थोपटे याचे लग्न होते. लग्नात कोणीही मास्क न लावता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. त्याचबरोबर कोणतेही वाद्य वाजवण्याची परवानगी घेतली नाही. याबाबत नवरा मुलगा व नवरी मुलीचे आई वडील यांच्यासह 20 ते 25 लोकांच्या विरोधात शिरुर पोलिसात 26 जून रोजी गुन्हा दाखल केल्याची माहिती शिरुरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापूरे यांनी दिली आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment