पीएम केअर्स फंडासाठी चायनीज कंपनीने दिले सात कोटी रुपये; काँग्रेसचा दावा


नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटकाळात सर्वच क्षेत्राकडून मदत मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम केअर्स फंडाची स्थापन केली होती. त्याचबरोबर पूर्व लडाखमधील गलवाण क्षेत्रात चीन सैनिकांसोबत झालेल्या झटपटीत 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशभरात चीन विरोधात संतापची लाट असतानाच आता याच पीएम केअर्स फंडासाठी चायनीज टेलीकॉम कंपनी हुवाईने सात कोटी रुपये दिल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

यासंदर्भातील वृत्त इकॉनॉमिक्स टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारतातील सहा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून या पार्श्वभूमीवर हुवाई या कंपनीने कोरोनाविरोधात लढण्यासाठी पीएम केअर फंडात सात कोटी रुपये दिले आहेत. हुवाई या कंपनीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वीच शरीराचे तापमान तपासणीसंर्भातील अद्ययावत तंत्रज्ञान भारताला देण्याची तयारी दर्शविली होती.

इकॉनॉमिक्स टाइम्सला हुवाई इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय चेन यांनी सांगितले की, आमच्या चीनमधील अनुभवाद्वारे भारतातील सध्याच्या कोरोनाच्या स्थिती विरोधात लढण्यासाठी शरीराचे तापमान तपासणीसंर्भातील अद्ययावत तंत्रज्ञानचा अभ्यास करत आहे. लवकरच आम्हाला यात यश येईल. सध्या ट्विटरवर हुवाई कंपनीने दिलेली मदत चर्चेचा विषय आहे. तर चीनकडून मदत घेण्यावर नेटकऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्याचबरोबर टीक-टॉकने किती मदत केली? अशी विचारणा काहींनी केली आहे. दरम्यान, आधीच पीएम केअर फंडासाठी कोरोनाविरोधात लढण्यासाठी भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांनी आपली मदत दिली आहे. पीएम केअर फंडासाठी रिलायन्स जिओने ५०० कोटी तर भारती एअरटेलने १०० कोटी रुपयांची मदत दिली आहे.

Leave a Comment